दि. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला. जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे नंदुरबार जिल्हा निर्मिती सोबतच जिल्हा परिषद नंदुरबार अस्तीत्वात आली. जिल्ह्यातील सहा तहसील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर नुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सहा पंचायत समिती तहसील मुख्यालयी कार्यरत आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषद चे मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र आहे. ग्राम विकास विभाग - महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली ग्रामीण क्षेत्रातील जन जीवन उंचविणे तसेच आरोग्य व मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य लोक प्रतींनिधी यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे.