लघुपाटबंधारे विभाग

नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत लघुसिंचांनाची कामे तीन उप विभागांमार्फत अन्वेषित व कार्यान्वित करण्यात येतात.                                                

त्या उप विभाग अंतर्गत खालीय प्रमाणे तालुके समाविष्ठ आहेत.

लघु पाटबंधारे विभागाकडे कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता याची आस्थापना , उप अभियंता यांचे कडील पेन्शन प्रकरण , उप अभियंता याची आस्थापना आहे एकूण 6 तालुक्यांपैकी 3 उपविभागाची शाखा अभियंता यांची आस्थापना या विभागाकडे आहे .                                                                                                           

सभांबाबत – जलव्यवस्थापन व स्वच्छता सभेचे सदस्य, सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना मदत म्हणून लघू पाटबंधारे विभाग काम करीत असते

योजनांबाबत- या विभागांमार्फत ० ते १०० हेक्टर्स सिचन क्षमतेच्या पाझर तलाव, गावतळे, को.प.बंधारे, संधानकात बांधले जाणारे साठवण बंधारे (सिमेंट प्लग), राबविण्यात येतात.पूर्व्र विभागाकडील बिगर आदिवासी क्षेत्राचे नियोजन विभागामार्फत व पश्चिम विभागाकडील आदिवासी क्षेत्राचे नियोजन आदिवासी प्रकल्पामार्फत करुन कामे घेतली जातात .                         

लघुसिंचन विभाग अंर्तगत योजनांचा तपशिल

1) कंत्राटदारांनी दाखल केलेल्या बिलास मंजुरी देणे..

2) विशेष दुरुस्ती/सर्व साधारण दुरुस्ती/ वित्त आयोग/पुरहानी दुरुस्ती/ आमदार निधी/ खासदार निधी/तिर्थक्षेत्र विकास/ डोंगर विकास, खान्देश विकास पॅकेज अंर्तगत विकास कामे.

3) आश्वाशित रोजगार/ जवाहर रोजगार योजना/ रोजगार हमी योजना मधील कामांना तांत्रिक मंजुरी देणे.

4) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती जनतेस उपलब्ध करुण देणे.

5) शाखा अभियंता/ स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक यांची आस्थापना.

6) गावांतील पाझर तलाव/ गांव तलाव/ साठवण बंधारे/ को. प. बंधारे इत्यादीच्या कामांस तांत्रीक मान्यता/ प्रशासकीय मान्यता देणे.

7) पझार तलावासाठी संपादीत केल्या जमिनीचा मोबदला बाबत कामकाज करणे.

8) ० ते १०० हेक्टर पर्यंतच्या जलसंधारणेच्या कामांस तांत्रीक मान्यता व प्रशासकीय मान्यता देणे.

रचना



अहवाल



महत्वाचे दुवे


© 2021 Copyright: iTcell Zilla Parishad Nandurbar