कृषी विभाग

कृषि विभागाकडील योजना 

1) जि. प. निधी योजना – 50% अनुदानावर पिक संरक्षण औजारे/औषधे, सुधारित कृषि औजारे, कडबाकुट्टी यंत्र, प्लास्टिक क्रेटस्, डिझेल/पेट्रोकेरोसिन/विद्युत मोटार, पंपसंच, पीव्हीसी पाईप व ताडपत्री इ. औजारे पुरवठा करणे. सौरपथ दिप / सौर कंदिल देणे.

लाभार्थी निवडीबाबतचे निकष

1) शेतकऱ्याचे नावे शेत जमीन असावी.

2) शेतकरी अल्प / अत्यल्प भू-धारक असला पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे –



1) संबंधीत गट विकास अधिकारी व कृषि अधिकारी यांचेकडे अर्जê

2) जमीन धारणेचा 7/12 किंवा 8 अ चा उतारा

3) कडबाकुट्टी यंत्र व विद्युत मोटार यासाठी वीजबील झेरॉक्स प्रत आवश्यक

लाभार्थीची निवड पध्दत-

शेतकऱ्याने गट विकास अधिकारी यांचेकडे कागदपत्रासह अर्ज करावा. कागदपत्रांची तालुका पातळीवर छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी कृषि समिती सभेमध्ये मंजूरीसाठी पाठविण्यात येते.

मंजुरीची प्रक्रिया व अधिकार –

गट विकास अधिकारी यांचे तर्फे कृषि विकास अधिकारी यांचेमार्फत मा. कृषि समितीकडे लाभार्थी निवडीचे पुर्ण अधिकार आहेत.

प्रत्यक्ष मदत/साध्यता-

ताडपत्री

पीव्हीसी पाईप

किटक व बुरशीनाशक औषधे

डिझेल/पेट्रोकेरोसीन/विद्युत मोटार पंपसंच

नॅपसॅक /एचटीपी/पॉवर स्प्रे पंप

इलेक्ट्रीक कडबाकुट्टी यंत्र

सायकल कोळपे

51, 9 व 6 इंची नांगर

सारायंत्र.

प्लॉस्टिक क्रेटर्स

सुधारित विळे

शेतकऱ्यांना उपरोक्त बाबींच्या खरेदी किंमतीच्या 50% अनुदानावर लाभ दिला जातो.

लाभार्थी हिस्सा – योजनानिहाय अनुदान वजा जाता 50% लाभार्थी हिस्सा.

कार्यवाही – जिल्हा परिषद निधीतून शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावर 50% अनुदानावर कृषि औजारे व साहित्याचे वाटप केले जाते.

2) अनु. जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अभिकरण योजना –

उद्देश – अनुसूचीत जाती / जमाती या संवर्गातील शेतकऱ्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणून त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती करणे.

योजनांचे क्षेत्र – अनुसूचीत जाती उपयोजना ही संपूर्ण पुणे जिल्हयाकरिता असून आदिवासी क्षेत्र उपयोजना ही केवळ खेड,जुन्नर,आंबेगाव व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना ही केवळ जुन्नर,आंबेगाव, खेड ,मावळ व वेल्हा तालुक्यांसाठी आहे.

लाभार्थी निवडीचे निकष –

1) लाभार्थी अनु. जाती / जमाती संवर्गातील असावा. (प्राधिकृत अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र)

2) शेतकऱ्याचे नावावर जमिन असावी.( कमाल मर्यादा – 6 हेक्टर)

3) शेतकऱ्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न अनु. जाती उपयोजनेसाठी रु.50,000/- पेक्षा कमी असावे.

4) आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना रु.25,000/- पेक्षा कमी असावे.

5) शेतकऱ्यास या योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.

6) लाभार्थी स्वेच्छेने शेतीची कामे करण्यास व योजनेत सहभागी होणेस उत्सुक असावा.

लाभार्थी निवडीचे अधिकार-

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समितीकडे लाभार्थी निवडीचे पुर्ण अधिकार आहेत. गटांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांस लाभार्थी निवड समिती मान्यता देते.

निधीची उपलब्धता – या योजना राज्य पुरस्कत असून संपुर्ण निधी राज्य शासनाकडून प्राप्त होतो.

आवश्यक कागदपत्रे –

1) गट विकास अधिकारी यांचे नावे अर्ज.

2) 7/12 व 8/अ चा तलाठयाकडील उतारा (6 महिन्यापुर्वीचा)

3) प्राधिकृत अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र.

4) प्राधिकृत अधिकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला किंवा बीपीएल लाभार्थी असलेबाबत प्रमाणपत्र.अनुदान – योजनेमध्ये निवड झालेनंतर लाभार्थ्यास दोन वर्षात जास्तीत जास्त रु
. 1,00,000/-(नविन विहिर करणाऱ्यास) किंवा रु. 50,000/- इतर बाबींसाठी लाभ देता येतो.

लाभार्थीना दयावयाच्या बाबी –

अ. क्र. बाब अनुदानाची मर्यादा रु.

1 निविष्ठा वाटप (1 हेक्टर मर्यादेत)रु.5,000/- च्या मर्यादेत

2 पिक संरक्षण / शेतीची सुधारीत औजारे रु.10,000/- च्या मर्यादेत

3 जमिन सुधारणा ( 1 हेक्टर मर्यादेत) मृद संधारण निकषानुसार रु.40,000/- च्या मर्यादेत

4 बैलजोडी / रेडेजोडी (स्थानिक बाजार भावानुसार) रु.30,000/- च्या मर्यादेत

5 बैलगाडी रु.15,000/- च्या मर्यादेत

6 जुनी विहिर दुरस्ती रु.30,000/- च्या मर्यादेत

7 इनवेल बोअरींग (नाबार्डच्या निकषानुसार) रु.20,000/- च्या मर्यादेत

8 पाईप लाईन (300 मीटर पर्यंत व (नाबार्डच्या निकषानुसार) रु.20,000/- च्या मर्यादेत

9 पंपसंच रु.20,000/- च्या मर्यादेत

10 नविन विहिर (रोहयो अंतर्गत जवाहर विहीर योजनेनुसार) रु.70,000/- ते रु.1,00,000/- च्या मर्यादेत

11 शेततळे (मृद संधारण निकषानुसार) रु.35,000/- च्या मर्यादेत

12 परसबाग कार्यक्रम (फलोत्पादन विभागच्या निकषानुसार) रु.200/- प्रती लाभार्थी

13 तुषार /ठिबक सिंचन संच पुरवठा रु.25,000/- च्या मर्यादेत

14 ताडपत्री (फक्त अनु.जाती उपयोजनेकरिता) रु.10,000/- च्या मर्यादेत

3) अपारंपारिक ऊर्जा –

अपांरपारिक उर्जा स्त्रोत निर्माण करणे मानवाच्या विकास व उन्नती मध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये विज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा ,तेल,नैसर्गिक वायु इ. पारंपारिक इंधन साठे दिवसे दिवस कमी होत चालले आहेत.उद्योग,ऊर्जा व कामगार विभागमहाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णयानुसार नविन व नित्यनुतनशिल ऊर्जा साधनाचा(अपारंपारिक ऊर्जा) कार्यक्रम राबविणेचे दृष्टीने धोरण जाहीर केले.

शासनाच्या धेारणाची अंमलबजावणी सन 2000 पासून जिल्हा परिषद पुणे मार्फत करणेत येत आहे. तसेच सदर कार्यक्रमांतर्गत सौरपथदिप,सौरकंदिल,ग्रामपंचायतीने निवडलेल्या अभ्यासिके मध्ये सौर घरगुती दिवे बसविणे इ. योजना राबविणेत येत आहेत. त्याची दैनंदिन देखभाल हि ग्रामपंचायतीने करणे आवश्क आहे.सार्वजनिक ठिकाणी बसविणेत आलेल्या सौरपथदिप व सौरघरगुती दिवे यांच्या देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविणेत यावी.

सौरपथदिप 

सौरपथदिपाचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे आहेत. मानवाच्या विकास व उन्नती मध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये विज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा ,तेल,नैसर्गिक वायु इ. पारंपारिक इंधन साठे दिवसे दिवस कमी होत चालले आहेत.उद्योग,ऊर्जा व कामगार विभागमहाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णयानुसार नविन व नित्यनुतनशिल ऊर्जा साधनाचा(अपारंपारिक ऊर्जा) कार्यक्रम राबविणेचे दृष्टीने धोरण जाहीर केले.

अ) सौर मोडयुलची क्षमता -74 वॅट

ब) बॅटरीची क्षमता – 12 व्होल्ट,75 ऐ.एच.

क) आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स

ड) एम.एस.पोल जमिनी पासून 4 मीटर उंच ,

ई ) 11 वॅट क्षमतेचा सी.एफ.एल. दिवा व फिक्सर



सौरपथदिपाचे कार्य

1) सौर संकलकामध्ये सुर्य प्रकाशाची डी.सी.विद्युत उर्जेत रुपांतर होते.

2) ही रुपांतरित ऊर्जा सौर बॅटरी चार्ज करणेसाठी वापरली जाते.

3) या बॅटरीवर एक सी.एफ.एल ची टयूब चालते

4) या टयूब संध्याकाळी (सुर्यास्तानंतर) आपोआप चालू होतात आणि सकाळी(सुर्योदयानंतर)आपोआप बंद होतात.

5) हिरवा दिवा बॅटरीचे चांर्जिग पूर्ण झाल्यानंतर थोडा वेळ चालू बंद होतो व नंतर बंद होतो.

6) बॅटरी डिसचार्ज झाली असेल किंवा चाजिंग कमी असेल तर लाल दिवा लागतो आणि चाजिंग पूर्ण झालेनंतर लाल दिवा बंद होतो.

सौर पथदिप वापरण्यासंबंधी मार्गदर्शक सुचना

1) सौर पथदिपाच्या बॅटरीची काही प्रमाणात देखभालीची गरज असते.

2) सौरपथ दिपाच्या नियंत्रका मध्ये बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती अधिकृत तज्ञाकडूनच करुन घ्यावी.

3) सी.एफ.एल. दिवा नादुरुस्त झाल्यास सी.एफ.एल. टयूब वरील कव्हर काढून टयूब बदलता येवू शकते. परंतु टयूब 4 पिनचीच असावी.

सौरसंच निगा व देखभाल

1) सौर संकलक (पॅनेल) काचेवर हवेमध्ये असलेली धूळ साचते व धूळीच्या थरामुळे सौर ऊर्जा सौरसेल्स पर्यत कमी प्रमाणात पोहचते.त्यामुळे ऊर्जा निर्मीतीचे काम बंद होते. व बॅटरी डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर 15 दिवसांनी सौर पॅनल वरची धूळ कपडयाने किंवा पाण्याने साफ करणे गरजेचे आहे.

2) सौर फोटोवोल्टीक पॅनलला नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश गरजेचे आहे. त्यावर कोणत्याही झाडाची / इमारतीची / तारेची सावली पडता कामा नये.

3) पॅनल नेहमी दक्षिण दिशेला झुकलेले असावे.

4) सौर पथदिपामध्ये दिलेल्या बॅटरीमध्ये दर 3 महिन्यांनी डिस्टील वॉटरची लेवल चेक करणे.गरज भासल्यास डिस्टील वॉटर टाकणे किंवा भरणे.

5) बॅटरी मध्ये जर डिस्टील वॉटर नसेल तर डिस्टिल वॉटर भरल्यावर दोन दिवसांनी बॅटरी पूर्ण पट्टीने दूर करावी. (साफ करावी) व पेट्रोलियम जेलीचा सुरक्षात्मक लेप लावावा.

वरील प्रमाणे सौर पथदिपाची देखभाल ही ग्राम पंचायतीने करणे आवश्यक आहे.

सौर अभ्यासिका

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांचेकडील प्राप्त अनुदानातून उद्योग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णया नुसार जिल्हयातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपारिक पध्दतीने विजेचा वापर करणे खर्चीक आहे. किंवा भार नियमनामुळे वीज पुरवठा खंडीत होतो अशा विविध ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या अभ्यासिकांमध्ये रात्रीच्यावेळी अभ्यास करणे सोईचे व्हावे या दृष्टीने तसेच विद्यार्थ्याना होणाऱ्या त्रासापासून काही प्रमाणात मुक्त करण्याच्या दृष्टीने सौर घरगुती दिपाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.म्हणून जिल्हयातील ग्राम पंचायती अंतर्गत असलेल्या सामुदायिक अभ्यासिका समाजमंदिर,ग्राम पंचायत कार्यालय,ग्राममंदिर,शाळा येथे विद्यार्थ्याची अभ्यासाची सोय व्हावी या दृष्टीने सौर घरगुती दिप बसविणेत येतो. यासाठी शासना मार्फत 90% अनुदान व 10% ग्राम पंचायत हिस्सा देणेत येतो. शासन निर्णया प्रमाणे एका गावासाठी फक्त एकच सौर अभ्यासिका बसविणे बंधनकारक आहे. सौर अभ्यासिकेमध्ये बसविणेत येणाऱ्या सौर घरगुती दिपाचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे

अ) सौर मोडयुलची क्षमता -74 वॅट

ब) बॅटरीची क्षमता – 12 व्होल्ट,75 ऐ.एच.

क) आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स

ड) एम.एस.ऍ़गल फ्रेम सौर पॅनल बसविणेसाठी

ई ) 9/11 वॅट क्षमतेचे 4 नग सी.एफ.एल. दिवे व फिक्सर

सौर अभ्यासिकेची देखभाल

1) सौर फोटोवोल्टीक पॅनलच्या काचेवर हवेमध्ये असलेली धुळ बसते व धुळीमुळे सौर ऊर्जा सौर सेल्स पर्यत कमी प्रमाणात पोहोचते त्यामुळे ऊर्जा निर्मीतीचे काम बंद होते व त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर 15 दिवसांनी तरी सौर पॅनलवरची धुळ कपडयाने किंवा पाण्याने साफ करणे गरजेचे आहे.

2) सौर फोटोवोल्टीक पॅनलला नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश गरजेचे आहे. त्यावर कोणत्याही झाडाची / इमारतीची तारेची सावली पडता कामा नये .

3) पॅनल नेहमी दक्षिण दिशेला झुकलेले असावे.

4) सौर संचामध्ये दिलिेल्या बॅटरीमध्ये दर 3 महिन्यांनी डिस्टील वॉटरची लेवल चेक करणे. गरज भासल्यास डिस्टील वॉटर (नि:क्षार पाणी ) टाकणे.

5) बॅटरी मध्ये जर डिस्टील वॉटर (नि:क्षार पाणी ) नसेल तर नि:क्षार पाणी भरल्यावर दोन दिवसांनी प्रकाश नळी प्रज्वलित होईल. ( दिवा लागेल)

6) बॅटरी टर्मीनलला कार्बन अथवा हिरव्या पांढऱ्या रंगाची बुरशी साठली असेल तर लाकडी पट्टीने दुर करावी (साफ करावी ) व पेट्रोलियम जेलीचा रक्षात्मक लेप लावावा. ग्रीस अथवा ऑईल लावू नये.

टिप: सौर अभ्यासिका दरररोज 4 तास दिवे चालविण्यात यावेत.सदर सौर दिवे चालू बंद करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी यांच्यांवर देण्यात यावी. तसेच दर महिन्यांतून एकदा सौर पॅनल पाण्याने धुणे व दर 3 महिन्यांनी बॅटरी मधील डीस्टील वॉटर चेक करण्याची जबाबदारी ग्रामपचंायत शिपाई कर्मचारी यांच्यावर देण्यात यावी.

सौरकंदिल

सौरकंदिलाचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे

1) सोलर पॅनेल – सूर्यप्रकाशाचे विद्युत शक्तीत रुपांतर करते.

2) पॅनल माऊटिंग क्लिप्स- सोलर पॅनल बसविणेस उपयोगी

3) कंदिल – इलेक्ट्रॉनिक्स सोबत बॅटरी व सी.एफ.एल. दिवा

4) वायर – सौरपॅनेल मध्ये तयार झालेली वीज कंदिलातील बॅटरी चार्ज करणेसाठी वायरचा (केबल) उपयोग केला जातो.

कार्यपध्दती –

सोलर फोटो व्होल्टाइक सिस्टिम मध्ये सोलर सेल द्वारा सुर्य प्रकाशाचे विद्युत शक्तीत रुपांतर करुन तयार झालेली वीज बॅटरी मध्ये साठविली जाते. आणि ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा प्रकाश मिळवणेसाठी उपयोगी ठरते.

सौरकंदिल वापरणे बाबत सुचना

1) उत्तर दक्षिण दिशेत सुर्यप्रकाश पडेल अशा रितीने,सावली नसलेल्या जागी सोलर पॅनल बसवावे. सोलर पॅनल दक्षिण दिशेकडे झुकलेले असावे.

2) सौर पॅनलचा पृष्ठ भाग स्वच्छ / कोरडया कापडाने स्वच्छ करावे.

3) सर्व जोडण्या व वायर्स पक्क्या व सुस्थितीत असल्याची खात्री करा.

4) बॅटरी दररोज चार्ज करायलाच हवी .

5) सौर कंदिल बंद पडल्यास नेहमी जवळच्या सेवा क्रेंद्राला किवा

6) सौर कंदिलाचा दररोज फक्त चार तासच वापर करावा.

4) केंद्र / राज्य पुरस्कृत योजना –

केंद्र पुरस्कृत 75 % राज्य पुरस्कृत 25% अभिकरण योजना करिता अनुदान प्राप्त झाल्यावर पंचायत समितीस्तरावरुन औजारे व औषधाची मागणी प्राप्त करुन घेऊन योजना राबविण्यात येते. 75 % केंद्र हिस्सा कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेत 25 % अनुदान मिळण्यासाठी मागणी नोंदविण्यात येते.

केंद्र पुरस्कृत गळीतधान्य विकास योजना –
सदर योजनेंतर्गत 50 % अनुदानानवर जैविक खते, पिक संरक्षण औजारे उदा. नॅपसॅक व पॉवर स्प्रेपंप, सुधारीत कृषि औजारे उदा. सारायंत्र, पेरणी यंत्र, पिक संरक्षण औषधे, सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई पाईप, ब्रशकटर, बहुपिक मळणीयंत्र दरकरारानुसार महामंडळाकडून प्राप्त अनुदान मर्यादेत पुरवठा करण्यात येतात. पंचायत समिती स्तरावरुन प्रथम मागणी करणाऱ्या शेतकऱ्यास 7/12, 8अ चा दाखला, अर्ज व 50 % रक्कम इ. पूर्तता झाल्यानंतर औजारे/औषधे वाटप करण्यात येतात.

केंद्र पुरस्कृत ऊस विकास कार्यक्रम योजना –
सदर योजनेंतर्गत 25 % अनुदानावर पिक संरक्षणऔजारे / सुधारीत कृषि औजारांचा पुरवठा उपलब्ध अनुदान मर्यादेत पंचायत समिती स्तरावर करण्यात येतो. तसेच प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम औजारे वाटप याप्रमाणे पंचायत समिती स्तरावरुन औजारे वाटप करण्यात येतात.

केंद्र पुरस्कृत एकात्मिक मका उत्पादन कार्यक्रम योजना –
सदर योजनेंतर्गत 50 % अनुदानावर कृषि आयुक्तालयाकडील उपलब्ध अनुदान मर्यादेत शासन दरकरारानुसार महामंडळामार्फत औजारे व औषधे पुरवठा करण्यात येतात. पंचायत समिती स्तरावरुन प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांस प्रथम औजारे वाटपकरण्यात येतात.

राज्य पुरस्कृत पिक संरक्षण योजना –
100 % राज्य पुरस्कृत योजना. सदर योजनेंतर्गत बटाटा पिकावरील करपा रोग व कांदा पिकावरील करपा रोग व फुलकिडे यांचे नियंत्रणासाठी 50 % अनुदानावर कॉपर ऑक्सिक्लोराईड, मॅन्कोझेब या बुरशीनाशकाचा व मॅलेथिऑन या किटकनाशकाचा उपलब्ध अनुदान मर्यादेत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडून खेड, जुन्नर, आंबेगाव व शिरुर या पंचायत समितींना पुरवठा करण्यात येतो. प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे औषधे वाटप पंचायत समितीकडून करण्यात येते.

केंद्र पुरस्कृत कृषि अभियांत्रिकीकरण योजना

केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना अर्तंगत शेतकऱ्यांचे प्रस्ताव व औजारे मागणी पंचायत समितीकडे नोंदवून 40 अश्वशक्ती पर्यंतचाच ट्रॅक्टर, पॉवरटिलर व रोटाव्हेटरसाठी पुर्वसंमती देण्यासाठी प्रस्ताव (अर्जदाराचा 7/12 व 8 अ उतारा, औजाराचे कोटेशन.

ट्रॅक्टरचलित औजारांसाठी ट्रॅक्टर असल्याबाबत आरटीसीटी झेरॉक्स प्रमाणीत प्रत, आवश्यक असल्यास जातीचा दाखला (झेरॉक्स प्रमाणीत प्रत) कृषि विभागाकडे पाठवावे. कृषि विकास अधिकारी यांची पुर्वसंमती प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी कोटेशनुसार औजारे खरेदी (महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ/महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ व महाराष्ट्र स्टेट को- ऑप मॉकेर्टिग फेडरेशन) करुन परिपुर्ण प्रस्ताव औजारे/ट्रॅक्टर पुरवठयाचे बिल (मुळ प्रत – डिलीव्हरी चलन – मुळ प्रत), रक्कम प्राप्त झाल्याची पुरवठा संस्थेची पावती मुळ प्रत, पुरवठा पुर्व गुणवत्ता तपासणी अहवाल, पुरवठयानंतर क्षेत्रीय गुणवत्ता तपासणी अहवाल/स्थळ तपासणी अहवाल, ट्रॅक्टर खरेदी असल्यास परिवहन अधिकाऱ्यांचे नोंदणी झेरॉक्स प्रमाणीत प्रत, बँक कर्जमंजूरी पत्र मुळ प्रत/ झेरॉक्स प्रमाणीत प्रत, रु. 100/- च्या स्टँपपेपरवर करारनामा) गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या मार्फत कृषि विकास अधिकारी यांनी आठ दिवासात शिफारस करुन पाठविण्यात यावेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अनुदान समायोजन करण्यासाठी महामंडळाकडे पाठविण्यात येतात.

मार्गदर्शक सूचनानुसार – अनुसूचित जाती- 15% , अनु. जमाती – 08 % , महिला शेतकरी – 30% व अपंग – 3% यांना टक्केवारीनुसार सदर योजनेत लाभ घेण्यासाठी नमुद असल्याने प्रस्ताव प्राधान्याने पाठविण्यात यावे. कृषि आयुक्तालयाकडील प्राप्त अनुदान लक्षांकानुसार प्रथम प्राप्त प्रस्तावास प्रथम प्राधान्य देऊन लक्षांकाच्या मर्यादित प्रस्तावाचे समायोजन करण्यात येईल


रचना



अहवाल



महत्वाचे दुवे


© 2021 Copyright: iTcell Zilla Parishad Nandurbar